Father of Er Suraj Laghe

शब्दांकन: साहेबराव खंडारे (पत्रकार)

    मला वाटते खऱ्याला खरे म्हणण्याचे धाडस अंबादास लाघे गुरुजी यांच्यात आहे. मी जेव्हा 'आम्ही काय केले ? हे सदर लिहायचो! तेव्हा अनेक जण खूप छान कामे झाली असे फोन करायचे,!मात्र गुरुजींनी प्रत्येक भागावर बेधडक चांगला रिमार्क दिला. म्हणून मी हे सांगू शकतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी लिहलेल्या घटनेचे महत्व गुरुजींना पटले आणि त्यांच्यामुळेच आपण सुखाने आहोत हे गुरुजी कबुल करतात. खरं म्हणजे आम्ही मूळ माझोड गावातील व्यक्तींचा शोध घेतला तेव्हा त्यातील लाघे गुरुजी म्हणजे आम्हांला गवसलेले एक विचारवंत रत्न होत.असे मला मनोमन वाटते.गुरुजी म्हणजे आमच्या सोबत विचाराने जुळलेले साथीदार होत असे हि मला वाटते. तेव्हा अशा या माझोड गावच्या रत्नाचा जन्म १ नोव्हेंबर १९६६ रोजी झाला.त्यांचे शिक्षण बि.ए. डि.एड. आरेखक(स्थापत्यशास्त्र), एन.सि .व्हि.टी.,डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.नोकरी :मुख्याध्यापक,न.प.अकोट केंद्र समन्वयक, सि.आर.सी. न.प.अकोट अशी आहे.

श्री. अंबादास ना. लाघे

    गुरुजींनी सांगितले की, त्यांच्या जीवनातील मोलाचे गुरूवर्य म्हणजे थोरात गुरूजी होत.मधुकर थोरात गुरुजींनी चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बसविले आणि ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे तेव्हापासून त्यांना शासनाचे वेतन सुरु झाले ते आजतागायत असे लाघे गुरुजींना वाटते.,सातवीच्या ही शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण होऊन ते आर्थिक लाभासाठी पात्र ठरले. त्यांच्या वेळेस सातवीला सार्वत्रिक परिक्षा होती. तेव्हा अकोला वाशिम एकच जिल्हा होता, तेव्हा अकोला जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील सर्व शाळातुन गुरुजी प्रथम आले होते. यावरूनच त्यांच्या बुद्धीची किती मोठी झेप होती हे लक्षात येते.नंतर कारंजा लाड ला ८ते १०चे शिक्षण झाले, त्याही ठिकाणी गुरुजी वर्गात प्रथम राहायचे.दहावी नंतर त्याकाळात योग्य मार्गदर्शनाच अभाव व घरची आर्थिक परिस्थिती तोलामोलाची असल्याने, पाँलीटेक्नीक वाशीम, यवतमाळ ला नंबर लागुन सुद्धा गुरुजींनी अकोला आय.टी.आय.ला प्रवेश घेतला.आणि खऱ्या अडचणीचा काळ सुरू झाला.

    अकोल्याकडे जाणारे कच्चे रस्ते असल्याने पावसाळ्यात नियमित १२किमी पायी जाणे येणे करावे लागले. एक दिवस कापशीच्या सांडव्याला माणसाला वाहून नेईल, असे पाणी होते.सोबत वर्ग मित्र विनायक मांजरे होते. कापशीला रात्री आठच्या दरम्यान पायी चालत सांडव्यापर्यंत ते आले. रात्र अंधारी होती, काहीच दिसत नव्हते,त्यामुळे कमी पाणी असेल म्हणून पाण्यात पाय टाकले.पण अनर्थ झाला. हे दोघेही मित्र वाहून जात असतांना त्यावेळचे आपल्या गावाचे सरपंच जयरामजी बाकडे यांना दिसले.आणि त्यांनी या दोघांना वाचवले,यानिमित्ताने लाघे गुरुजींच्या अशा आठवणी ताज्या झाल्या. दुसऱ्या वर्षाला सकाळ पाळी होती, आय.टी.आय. फाटकात सात वाजन्यापूर्वी जायचे असे, त्यामुळे सकाळी एस.टी नसायची, म्हणून एकट्याने सायकलने जायचे ठरविले. वडिलांनी सायकल घेऊन दिली पण घरी घड्याळ नसायची, माझी माय सकाळी किती वाजता उठायची हे आज सांगता येत नाही, परंतु दिवस निघायच्या आत अकोल्याला पोहचायचो. असे गुरुजी सांगतात.एक दिवस वेळेचे गणित चुकलं आणि गुरुजी दिवस निघायच्या एखादा तास अगोदरच पोहचले. एक दिवस एस.टी.पास संपल्याने कंडक्टर यांने हिंगणा फाट्यावर बसमधून उतरून दिले ,मग पायी चालत येतांना भरतपूर येथील अकोला गवत विकनारे यांनी सायकल वर बसवून आणले.हि आठवण पण त्यांना आली.

    शिक्षणासाठी तसेच कुटुंबाला मदत व्हावी यासाठी अकोल्याला डवरे, गाडी हाकलने, अशास्वरूपाची कामे केलीत, अर्निंग अँड लर्निंग हा फार्मूला वापरून सतत १२ते १३तास अभ्यास करून हे यश मिळविले असल्याचे गुरुजींना वाटते. कराडला इंजिनिअरींगच डिप्लोमा करतांना जवळील पैसे संपल्याने दोन दिवस कच्चे पोहे खालले, रेल्वेने विनाटिकीट प्रवास करतांना बंद फाटकाला लटकून उपासी पोटी एक किलोमीटर प्रवास केला. नंतर आतील लोकांना दया आली आणि त्यांनी रेल्वेत घेतल्यांने आज हा प्रसंग लिहू शकलो.असेहि गुरुजींनी सांगितले.

    त्यांचा मुलगा सूरज हा बि.ई. झाला असून स्वतः चा सिव्हिल इंजिनिअरिंग चा व्यवसाय आहे.तर मुलगी अश्र्विनी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरींग असून स्वतःचे सिव्हिल इंजिनिअरचे ऑफिस आहे. तर तिसरा मुलगा श्यामसुंदर हा पदवी शिक्षण घेत असून भारतीय सैन्यात किंवा पोलीस सेवेत रुजू होण्यासाठी तयारी करीत आहे. पत्नी गृहिणी आहेत. तेव्हा एव्हढया बिकट परिस्थितीतून मोठे झालेल्या या गुरुस वंदन.
-------------------------------------------------------------------------

सूरज लाघे (लाघे गुरुजींचा मुलगा): "लोकांना बाबासाहेब आंबेडकर वाचावे लागता... समजावे लागतात... आम्हाला तर तुमच्या रुपाने बाबासाहेब जिवंतपणे अनुभवायला मिळाले आहेत. Thanks for everything"