Pre-Approved Home Loan - Building Permission

माझ्या एका बांधकाम साईट वर काम सुरु करण्याआधी घर मालकांनी माझ्या कडून बांधकाम परवानगीचे प्रकरण सादर केले होते. बांधकाम परवानगीसाठी लागणारा वेळ हा काही महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतो. उदा. तुम्ही सादर केलेले कागदपत्र, प्रस्तावित नकाशा, अधिकारी हजर आहेत का? इत्यादी.

ह्या केस मध्ये आम्हाला अकोला महानगर पालिकेने कागदपत्रात त्रुटी असल्याचे सांगितले. त्रुटी म्हणजे, जागेची मोजणीशीट सादर करावी. मुळात ही मागणी चुकीची नाही. त्यामुळे मी मालकांना भूमिअभिलेख कडून मोजणीशीट मिळवण्यास सुचवले. मात्र सरकारी काम म्हटले की वेळ तर लागणारच. ह्यात मालकांना  मोजणीशीट मिळवण्यासाठी चार महिने लागले. मोजणीशीट मिळताच मी लगेच कागदपत्रांची त्रुटी पूर्ण केली आणि आम्हाला बांधकाम परवानगी मिळाली. पण बांधकाम परवानगी सादर करणे, मोजणीशीट मिळवणे, त्यात निवडणूक आल्या मग अधिकारी हजर नसणे अश्या सरकारी कारणांमुळे आम्हाला बांधकाम परवानगीसाठी एक वर्ष लागले.


मग आता आम्हाला प्रत्यक्ष बांधकाम सुरु करावयाचे होते. पण मालकांनी बांधकाम परवानगी आधीच होम लोन मंजूर करून घेतले होते. बांधकाम परवानगी आधीच होम लोन मंजूर करून घेणे चुकीचे नाही. पण बँकेच्या काही अटी-नियम असतात. बँकेचे असे मत होते की, "तुम्ही दिलेल्या वेळेत बांधकाम पूर्ण केले नाही तर तुम्हला पेनल्टी भरावी लागेल." ह्यात कोण चूक कोण बरोबर ह्यात वेळ घालवण्या पेक्षा आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की, बँक तुम्हला बांधकाम परवानगी आधीच होम लोन मंजूर का करून देतात? उत्तर अगदी सोपं आहे: होम लोन दिले आता हफ्ता सुरु. मग ह्या वर उपाय काय?

बघा बांधकाम परवानगी मिळवणे; हे के सरकारी काम आहे. कोणी किती ही ओरडू ओरडू सांगितले तरी आजही आपल्याकडे सरकारी कामाला वेळ लागतोच. त्यामुळे बांधकाम परवानगी आधीच होम लोन मंजूर करून घेण्यापेक्षा आधी बांधकाम परवानगी सादर करा, ती बांधकाम परवानगी मिळवा आणि मग होम लोनसाठी प्रकरण सादर करा. मान्य आहे की वेळ जाईल पण हे एक्सट्रा पेनल्टीचे टेन्शन नको. तुमचे काय मत आहे? नक्की कंमेंट करा. धन्यवाद.

Related Information:


No comments